भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांचा सामनातील अग्रलेख म्हणजे महिलांबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण आहे’ असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचे वाभाडे काढले आहेत. तर त्याचवेळी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनादेखील सवाल केला आहे.
सध्या बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारवर जनतेचा रोष दिसून येत आहे. तरिदेखील सत्ताधारी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे सरकारच्या कारभाराची भलामण करण्यात आली आहे. यावरूनच चित्रा वाघ यांनी टीकास्त्र डागले आहे.
हे ही वाचा:
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस कालवश
मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज
हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे
देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
संजय राऊत यांचा आजचा सामना अग्रलेख म्हणजे महिलांबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं एक उदारण आहे. एका महिलेवर पाशवी बलात्कार झालाय ,अमानवी अत्याचार झालाय. त्या अतिव अशा वेदनेने तिचा मृत्यू झाला आहे ज्याची कल्पना तुम्हाला या जन्मात येणार नाही. पण या दुर्दैवी घटनेवर तुम्ही राजकारण करताय. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांची तुलना करताय. नाकर्तेपणा हा तुमचा गुणधर्म आणि मग आम्ही त्या ठिकाणी हल्लेखोरला, आरोपीला पकडू, शिक्षा देऊ अशी भावनीक भूरळ घालताय.
राऊतजी तुम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर कधी झालात? तुम्ही घोषित करून टाकले की एका नराधमाला आम्ही पकडले आहे. आमचा विश्वास याच्यामध्ये एका माणसाचे काम नाही. एका पेक्षा अधिक लोक यात असले पाहिजे. मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे आणि त्याच्या आधी तुम्ही डिक्लेअर करून टाकलं. कोणाला वाचवताय? कसली ही विकृती? असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनादेखील चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे. तुमचे कार्यकारी संपादक अमानवी, पाशवी बलात्काराचा उपयोग आपल्या राजकीय हेवेदाव्यांसाठी करत आहेत. त्यामुळे या तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या तुम्ही कधी आवळणार आहात?
संजय राऊतांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं उदाहरण आहे
मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरेंना विचारायचयं की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करताहेत pic.twitter.com/1LHF0OECi0
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021