अग्रलेख लिहिला म्हणजे घाव वर्मी लागला

अग्रलेख लिहिला म्हणजे घाव वर्मी लागला

“नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलले. जनहिताचे मुद्दे उचलणे ही आमची जबाबदारी आहे, तशीच वृत्तपत्राचीही आहे. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला, त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आले.” असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

“अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज तोडणी करणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज तोडणी सुरु केली आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहोत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “राज्य सरकार लबाडी करत आहे. पुढच्या तीन महिन्यात सरकार येईल का नाही? याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलतील,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?

 

“कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना सरकारकडून दिसत नाही. लॅाकडाऊन ही प्रभावी योजना नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे आणि सरकारच्या चुका दाखवणे हे आमचं काम आहे आणि ते काम आम्ही केलं.” असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version