यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?

यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना बुधवार,२५ मे रोजी ईडीने समन्स पाठवले होते. मात्र, यशवंत जाधव या चौकशीला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशवंत जाधवांना चौकशीसाठी ईडी पुन्हा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान ईडीने यशवंत जाधवच्या दोन्ही मुलांचा जबाब नोंदवला आहे.

यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. या चौकशीत ईडीकडून यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात जात होती. यासंदर्भात दुबईतील सिनर्जी व्हेंचर्स कंपनीविरोधात चौकशी होणार आहे. मात्र यशवंत जाधव चौकशीलाच गैरहजर राहिले होते. दरम्यान, यशवंत जाधवांच्या दोन्ही मुलांविरोधात फेम कायद्याअंतर्गत जबाब नोंदवला आहे.

हे ही वाचा:

हिंदुस्तान झिंकमधील संपूर्ण हिस्सा विकणार सरकार

योगी करणार श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी

अनिल परबांवर ईडीची धाड! सात ठिकाणी छापेमारी, गुन्हासुद्धा दाखल

यासिन मलिकला जन्मठेप

काही दिवसांपूर्वीच यशवंत जाधवांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात त्यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये जाधवांनी केलेल्या अनेक व्यवहारांची नोंद केली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांची आर्थिक उलाढाल या डायरीच्या माध्यमातून पुढे आली. यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. २५ फेब्रुवारीला आयकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे.आता ईडीकडून त्यांनी केलेल्या परदेशी गुंतवणुकीची चौकशी होणार आहे.

Exit mobile version