कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून नोटीस येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून राष्ट्रवादीचे कोणते पाच नेते ईडीच्या रडारवर असतील याकडे लक्ष असणार आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून काही दिवसांपूर्वी भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही असेच खळबळजनक ट्विट केले होते. तेव्हापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं सूचक ट्विट १६ ऑगस्ट या दिवशी मोहित कंबोज यांनी केलं होतं. तर २०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असून संबंधित नेत्याची भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे, असही खळबळजनक ट्विट मोहित कंबोज यांनी केलं होतं.

Exit mobile version