राज्याचे माजी गृहमंत्री यांची याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. देशमुख यांना मनी लाँड्रिंग आणि १०० कोटीं रुपयांच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेकदा नोटीस बजावली. नोटीस बजावून सुद्धा ते ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत. ईडीने कारवाई करू नये यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.त्यामुळेच आता सतत गैरहजर राहात असलेल्या देशमुखांवर अटकेची टांगती तलवार आता असणार आहे.
अनिल देशमुख हे समन्सला जुमानत नसून ते कुठे आहेत याचाही ठावठिकाणा नाही. त्यामुळेच आता ईडीने लूकआऊट नोटीसची तयारीही केली होतीच. शिवाय आता पाचव्या समन्सलाही प्रतिसाद न दिल्याने आता थेट अटकेची तयारी ईडीकडून करण्यात येणार आहे अशी माहिती दिली जाते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता सचिन वाझेबरोबर तुरुंगात जावे लागणार आहे. त्यांना आता १ हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा देखील हिशेब द्यावा लागणार आहे, असे किरीट सोमय्या याआधीच म्हणाले होते. अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता अनिल देशमुख यांना तत्काळ अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याकरता ईडी सज्ज झालेली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…
म्हणतोय चीन; ‘हम दो, हमारे तीन’
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही मागण्या केल्या होत्या. यात तपासाला स्थगिती देणे, ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावे, अटकेची कारवाई करण्यास मनाई करावी, अशा मागण्यांचा समावेश होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अनिल देशमुखांसदर्भातील याचिका फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांची याचिका फेटाळल्याने हा अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचे स्पष्ट चित्र झालेले आहे.