शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये रविवारी संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सदरातील लेख प्रसिद्ध झाला. त्यामुळे हा लेख संजय राऊतांनी कोठडीत असताना लिहिला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोठडीत असताना न्यायालयाच्या विशेष परवानगी शिवाय लेख लिहिणे बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कुठल्याही सदरासाठी लिखाण करू शकत नाहीत. त्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी लागते आणि संजय राऊतांना अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळेच आता या प्रकरणी ईडी अधिकाऱ्यांकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे
अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?
१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार
म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे
मुंबईमधून जर राजस्थानी आणि गुजरातील समाज गेला तर मुंबई आणि महाराष्ट्रात पैसा शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. रविवारी प्रकाशित झालेल्या ‘रोखठोक’मध्ये यावरून संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ईडी त्यांच्यावर कारवाई करते यावर देखील राज्यपालांनी काहीतरी बोलायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.