राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. राहुल गांधी यांची सोमवार, २० जून रोजी चौथ्यांदा चौकशी करण्यात आली. राहुल गांधी यांची काल सुमारे १० तास चौकशी झाली. राहुल गांधी यांना ईडीने मंगळवार, २१ जून रोजीही चौकशीसाठी बोलावं चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे.

राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे ३० तासांहून अधिक चौकशी केली होती. त्यानंतर काल त्यांची पुन्हा साधारण १० तास चौकशी करण्यात आली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

गेल्या शुक्रवारी ते तपास यंत्रणेसमोर हजर होणार होते. मात्र राहुल गांधी यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांची आई सोनिया गांधी आजारी असल्याने त्यांना शुक्रवारी होणाऱ्या चौकशीतून सूट देण्याची विनंती केली होती. ईडीने त्याची विनंती मान्य करून त्यांना २० जूनला हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.

हे ही वाचा:

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोविड-१९ च्या प्रकृतीच्या त्रासामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Exit mobile version