राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल का गेले ईडी कार्यालयात?

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल का गेले ईडी कार्यालयात?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची करडी नजर असतानाच, आता राष्ट्रवादीचे दुसरे दिग्गज नेतेही ईडीच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज (२३ ऑगस्ट) दुपारी ईडी कार्यालयात गेले. पटेल यांची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याच प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल झाले होते. पण ते कार्यालयात फार वेळ न थांबता स्वाक्षरी करुन परत निघाले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अडवून प्रश्न विचारले.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरुन चौकशी झाली होती. प्रफुल्ल पटेल यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. असिफ मेमनच्या अकाऊंटवरुन काही कोटींची ट्रान्झॅक्शन्स पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झाल्याचा संशय आहे.  इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि मुलगा असिफ आणि जुनैद यांच्या नावे सीजे हाऊस इमारतीत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या बदल्यात असिफनं पैसे मिलेनियम डेव्हलपर्सला दिल्याचा संशय आहे.

सीजे हाऊस ही वरळीतली हायप्रोफाईल सोसायटी आहे, जी पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित केल्याची ईडीची माहिती आहे. ईडी चौकशीनंतरही इक्बाल मिर्चीसोबत मिलेनियमनं कुठलेही आर्थिक व्यवहार केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलं होतं. मिर्ची कुटुंबाला सीजे हाऊसमध्ये दिलेली प्रॉपर्टी ही भाडेकरु कायद्याच्या अंतर्गत असलेल्या अधिकारांमुळे दिल्याचा पटेल यांचा दावा आहे.

हे ही वाचा:

हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच

उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे

लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच

जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय

महाराष्ट्र विधानसभेची २०१९ मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील समावेश होता. तसेच प्रफुल्ल पटेल यांचंही नाव समोर आलं होतं. त्यावेळी प्रफुल्ल यांनी इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार केल्याचं पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर कबूल केलं होतं.

Exit mobile version