बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

बुधवारी होणार चौकशी  

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना समन्स बजावले आहे. वेलरासू यांना मंगळवारी, तर पेडणेकर यांना बुधवारी चौकशीला बोलावण्यात आले आहे.

बॉडी बॅग खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ECIR दाखल केले होते. माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांची देखील ECIR मध्ये नावं आहेत. कथित फसवणूकीची रक्कम सुमारे ४९.६३ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

करोनामुळे काळात मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर आणि इतर वरिष्ठ नागरी अधिकार्‍यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ (लोकसेवक किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासाचा भंग करणे), ४२० (फसवणूक) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version