अनिल देशमुख ११ वाजता पोहोचणार ईडी कार्यालयात

अनिल देशमुख ११ वाजता पोहोचणार ईडी कार्यालयात

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर धाडसत्र आरंभल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.

शुक्रवारी ईडीने छापेमारी केल्यानंतर देशमुख यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना विशेष कोर्टात शनिवारी उभे करण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट कसे दिले जात होते, असा आरोप केला होता. त्यात देशमुख यांच्यावर त्यांनी हा थेट आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. शुक्रवारी ईडीने देशमुख यांच्या नागपूर तसेच मुंबईतील दोन निवासस्थानांवर छापे मारले. त्याशिवाय, शिंदे आणि पालांडे यांच्या घरांवरही धाडी घालण्यात आल्या. वरळीच्या घरावर धाड घातली तेव्हा स्वतः देशमुख आणि त्यांची मुलेही तिथे उपस्थित होती.

हे ही वाचा:

राज्यात पुन्हा कडक निर्बंध

भारताने केली पिनाका आणि १२२ एमएम कॅलिबर रॉकेटची यशस्वी चाचणी

कोरोनाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ जोडे मारण्याच्या लायकीचे!

शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण

गेल्या काही महिन्यात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने जवळपास १२ बारमालकांकडून उकळलेले ४ कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या काही बनावट कंपन्यांच्या मार्फत हे पैसे देशमुख यांच्याकडे वळविण्यात आले होते. या कंपन्या देशमुख यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या असल्याचीही माहिती पुढे आली होती.

 

Exit mobile version