खासदार संजय राऊत यांना ईडीचं पुन्हा समन्स

खासदार संजय राऊत यांना ईडीचं पुन्हा समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. आज, २० जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून संजय राऊतांना देण्यात आले आहेत. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने हे समन्स दिल्याची माहिती आहे.

खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करत बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात चौकशीत शिवसेना नेते संजय राऊत यांचं नाव पुढे आल्यामुळे ईडीने राऊत यांना २८ जून रोजी समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी राऊत यांनी ईडीकडे वकिलामार्फत १४ दिवसांची वेळ मागितली होती. ईडीने १४ दिवसांची विनंती फेटाळून लावत १ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी राऊत यांना दुसरे समन्स बजावले होते. त्यानंतर संजय राऊत यांची दहा तास चौकशी करण्यात आली.

दरम्यान, यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची नऊ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version