35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामाशिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

Google News Follow

Related

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. या समन्समधून पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश भावना गवळी यांनी देण्यात आले आहेत. तसेच त्या चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणं देत चौकशीला येऊ शकत नाही असं म्हणत अनुपस्थिती दर्शविली होती.

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचे, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र, ४३ कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. तर ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्यांच्याविरोधात १०० एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा