शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

शिवसेना नेते यशवंत जाधव यांना मोठा झटका बसला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली होती. आता यशवंत जाधव यांना फेमा कायद्यानातर्गत ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. परदेशात केलेल्या गुंतवणूक प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

बुधवार, २५ मे रोजी, ईडीने यशवंत जाधव यांना समन्स पाठवले आहे. काही दिवसांपूर्वीच यशवंत जाधवांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात त्यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये जाधवांनी केलेल्या अनेक व्यवहारांची नोंद केली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांची आर्थिक उलाढाल या डायरीच्या माध्यमातून पुढे आली. यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. आता ईडीकडून त्यांनी केलेल्या परदेशी गुंतवणुकीची चौकशी होणार आहे.

हे ही वाचा:

भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पंजाब मंत्रिमंडळातून हकालपट्टी

टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत

महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. याआधी नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईनंतर मलिकांच्या अनेक मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मलिक हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.

Exit mobile version