31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणअनिल परब ईडी समोर येणार?

अनिल परब ईडी समोर येणार?

Google News Follow

Related

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडने अनिल परब यांना दुसरे समन्स पाठवले आहे. मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी परब यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. या आधी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्यावेळी त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे करत अनिल परब चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री अनिल परब हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहेत. सुरुवातीला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांचे नाव घेतले होते. तर त्यानंतर परिवहन खात्यातील बदल्यांच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील दापोली येथे असलेले अनिल परब यांचे रिसोर्ट अनधिकृत असल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

सद्ध्या अनिल परब यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी मार्फत चौकशी होणार. आहे त्यासाठी सक्तवसुली संचालनालयातर्फे चौकशीसाठी बोलावले जात आहे. अनिल परब यांना ईडीने हे दुसरे समन्स पाठवले आहे. त्यामुळे आता यावेळी तरी अनिल परब हे चौकशीसाठी हजर राहणार का? की तेदेखील अनिल देशमुखांप्रमाणे ईडीपासून पळ काढाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा