28 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामासरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त

सरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त

Google News Follow

Related

ईडीची कारवाई, ११.३६ कोटींची मालमत्ता

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक यांची ११.३६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन फ्लॅट आणि मालमत्ता पीएमएमए अंतर्गत जप्त केली आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

ठाण्यातील दोन फ्लॅट्स आणि टिटवाळ्यातील भूखंड जप्त झाला आहे. प्रताप सरनाईक यांना दणका देत ईडीने ११.३६ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. सध्या शिवसेनेचे चार नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये मंत्री अनिल परब, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक आणि खासदार भावना गवळींच्या समावेश आहे. ठाण्यातील हल्लीची ईडीची ही मोठी दुसरी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली होती.

हे ही वाचा:

“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा  

बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व

पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड 

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी

ठाण्यातल्या पोखरण रोड क्रमांक १ येथे उभारलेल्या छाबय्या विहंग गार्डन प्रकरण काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. ठाणे महानगरपालिकेने २००८ मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंड माफ केला. त्यानंतर या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली होती. त्यामुळे आता या नव्या प्रकरणावरून पुन्हा भाजपा- शिवसेना वाद रंगण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा