सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील विविध ठिकाणी मंगळवार, २ ऑगस्ट रोजी छापेमारी केली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड मनीलॉन्डरिंग प्रकरणी चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा कारवाई केली आहे.
ईडीने नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित ईडीने ही कारवाई केली आहे. पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय उघडू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत. तसेच कार्यालय सील करण्यात आलं आहे.
Delhi | The Enforcement Directorate seals the National Herald office, instructing that the premises not be opened without prior permission from the agency. pic.twitter.com/Tp5PF5cnCD
— ANI (@ANI) August 3, 2022
ईडीने काल १४ ठिकाणी मनीलॉन्डरिंग कायद्याच्या अंतर्गत अधिक माहिती गोळा करण्यासाठी ही छापेमारी केली. असोसिएट जर्नल्स लि. च्या अंतर्गत असलेल्या विविध मालमत्तांवर ही छापेमारी केली गेली. या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र चालवले जात होते.
असोसिएटेड जर्नल्स या कंपनीने काँग्रेसकडून ९०.२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते ते वसूल करण्यासाठी यंग इंडियनने केवळ ५० कोटी रुपये देत असोसिएटेड जर्नल्स ही कंपनी ताब्यात घेतली.
हे ही वाचा:
अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त
उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!
सोनिया गांधी यांची नुकतीच यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात आली असून देशभरात काँग्रेसकडून यासंदर्भात आंदोलने सुरू होती. तर यापूर्वी राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती.