पश्चिम बंगालमध्ये बुधवार, २४ जानेवारी रोजी पहाटेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे (टीएमसी) नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे शेख यांच्या घराचे कुलूप तोडून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या पथकासोबत केंद्रीय दलाची टीमही हजर आहे.
रेशन घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीचं ईडीच्या पथकाने टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकला होता. पण, त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केला होता. यात ईडीचे अधिकारी जखमी झाले होते. यावेळी स्थानिक पोलिसांनीही ईडीच्या अधिकाऱ्यांकडे वॉरंट मागितले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली आहे.
तृणमूल काँग्रेस नेते शाहजहान शेख यांच्या घरापासून ते रस्त्यापर्यंत केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या पथकासोबत जवळपास १०० सुरक्ष रक्षक आहेत, सुरक्षा रक्षकांनी शेख यांच्या घराला घेराव घातला आहे. दरम्यान, शेख यांच्या विरोधात ईडीने लुकआउट नोटीस जारी केली आहे.
स्थानिक पोलिसांना संपूर्ण धाडीची व्हिडिओग्राफी करायची होती मात्र, ईडीने यासाठीची परवानगी नाकारली आहे. छाप्याच्या वेळी पोलिसांसोबत दोन साक्षीदार असतील, असं ईडीने सांगितले होते. यावेळी ईडीने शाहजहान शेख यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती, असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार
भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार
गेल्या काही दिवसापूर्वी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकला होता त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यांच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. यात काही अधिकारी जखमी झाले होते. तसेच माध्यमांच्या वाहनांवरही हल्ला झाला होता, असं सांगण्यात येत आहे.