राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक मोहीम चालवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पवार यांच्या निकटवर्तीयांवर ईडी आणि आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. अजित पवार यांच्या बहीणी आणि मुलावर पडलेल्या आयकर विभागांच्या धाडींच्या घटना ताज्या असतानाच या यादीत आणखीन एका नावाचा समावेश झाला आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीने छापे घातले आहेत.
गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी सक्तवसुली संचालनालयाचे पथक धडकले. जगदीश कदम यांच्या पुण्यातील सहकार नगर मधील निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली आहे. जगदीश कदम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. दौंड साखर कारखान्यातील गैर व्यवहार प्रकरणात ही छापेमारी सुरु आहे.
हे ही वाचा:
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’
नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी
जगदीश कदम हे दौंड साखर कारखान्याचे संचालक आहेत. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर धाड पडली तेव्हा ते पुण्यात नव्हते. ते आपल्या मुंबई येथील निवासस्थानी होते. या धाडीची माहिती मिळताच जगदीश कदम हे पुण्याच्या दिशेने रावण झाल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या निरनिराळ्या नेत्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साखर कारखान्यांच्या गैरव्यवहारा संदर्भात आरोप होत आहेत. या मध्ये दौंड साखर कारखान्याचाही समावेश आहे. याच संदर्भात आता सक्तवसुली संचालनालय सक्रिय झाले असून दौंड साखर कारखान्याच्या संचालकांवर धाडसत्र सुरु झाले आहे.