आम आदमी पार्टीच्या सत्येंद्र जैन यांच्याकडे काही कोटींची मालमत्ता सापडली

आम आदमी पार्टीच्या सत्येंद्र जैन यांच्याकडे काही कोटींची मालमत्ता सापडली

आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर ईडीने धाडी टाकल्या. त्यात २.८५ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याची १३३ नाणीही सापडली आहेत. पण आम आदमी पार्टीने ईडीचे हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

आपचे नेता सौरभ भारद्वाज यांनी ईडीचे पत्र जारी करत म्हटले आहे की, छापेमारीदरम्यान काही कागदपत्रे, एक डिजिटल उपकरण आणि २ लाख ७९ हजार २०० रुपये इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. पण ती रक्कम जप्त करण्यात आलेली नाही.

ईडीने म्हटले आहे की, ज्यांच्यावर सोमवारी छापेमारी करण्यात आली त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने जैन यांच्याशी संबंध राहिलेला आहे. ज्या पैशांची कोणतीही नोंद नाही असे २.८५ कोटी रुपये तसेच सोन्याची नाणी लपवून ठेवण्यात आली होती.

आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे की, या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आलेल्या नाहीत असे पत्र ईडीने जैन यांच्या पत्नी आणि मुलीला दिले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री असलेल्या जैन यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली होती आणि ९ जूनपर्यंत ते ईडीच्या कोठडीत होते. ईडीने सोमवारी दिल्ली व आसपासच्या परिसरात एका ज्वेलर समवेत सात ठिकाणी छापेमारी केली.

हे ही वाचा:

दूरदर्शनचा आवाज काळाच्या पडद्याआड; प्रदीप भिडे यांचे निधन

का होतोय बीडीडी चाळींच्या नामकरणाला विरोध?

५० लाख खर्च केले पण विजयदुर्ग दयनीयच!

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवास

 

दरम्यान भाजपा प्रवक्त शहजाद पूनावाला आणि कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. पूनावाला यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः इमानदार असल्याचे सांगतात पण जेलमध्ये गेलेल्या मंत्र्याकडून राजीनामाही घेत नाहीत.

Exit mobile version