28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामापंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे

Google News Follow

Related

देशात पंजाबसह इतर राज्यांमध्ये निवडणुकीची लगबग चालू असताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. बेकायदेशीररित्या सँड मायनिंग सुरू असल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या आठ सदस्यांच्या पथकांनी ही कारवाई केली असून ईडीने राज्यात अन्य दहा ठिकाणीही छापेमारी केली आहे.

ईडीच्या टीमने मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोहालीतील होमलँड सोसायटीतील भूपेंद्र सिंह हनी यांच्या फ्लॅटवर छापा मारला. भूपेंद्र सिंह हनी हे चरणजीत सिंग चन्नी यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ईडीने भूपेंद्र सिंग हनी यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. ईडीची छापेमारी अजूनही सुरू असून या ठिकाणी सीआरपीएफच्या टीमचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भूपेंद्र सिंग हनी यांच्या घरासहीत पंजाबमध्ये आणखी १० ते १२ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. भूपेंद्र सिंग यांच्यावर बेकायदेशीरपणे वाळू उपसाचे कंत्राट घेतल्याचा आरोप आहे. हा ठेका मिळवण्यासाठी त्यांनी एक फर्म बनवली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ही छापेमारी सुरू असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

हे ही वाचा:

भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!

कोरोना काळात आयातीला ‘सोन्याचे दिवस’

गावित बहिणींची फाशी रद्द, आता मरेपर्यंत जन्मठेप

पंजाबमध्ये भगवंत मान ठरले ‘आप’ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. आधी पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र, संत रविदासांची जयंती असल्याने ही निवडणूक चार दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा