29 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरक्राईमनामा'मिर्ची' प्रकरणात प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस

‘मिर्ची’ प्रकरणात प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस

Google News Follow

Related

प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात पुन्हा एकदा समन्स बजावला जाणार असून, त्यांना ईडी कार्यालयात आता हजेर व्हावे लागणार आहे. यापूर्वीसुद्धा प्रफुल पटेलांना समन्स पाठवण्यात आला होता, मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती मिळालीय. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आले होते. त्यामुळेच ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे.

ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात ईडीने नुकतेच एक आरोपपत्रं दाखल केले होते. इक्बाल मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही साथीदारांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ईडीने २६ सप्टेंबर २०१९ रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात ९ डिसेंबर २०१९ रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची कोर्टाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीची दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा