शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असलेले यशवंत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या कचाट्यात सापडले आहेत. जाधव यांच्या घराची आयकर विभागामार्फत झडती घेण्यात आली असून त्यांना या तपासात अनेक महत्वाची कागदपत्रे हाती लागले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या दरबारी जाणायची चिन्हे आहेत.
जवळपास चार दिवस चाललेल्या या झाडाझडतीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जाधव यांच्याशी संबंधित जवळपास १२ शेल कंपन्या असल्याची माहिती समोर आल्याचे समजते. तर या कंपन्यांच्या माध्यमातून जाधव यांनी आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे आता जाधव यांची केस ईडीच्या हाती दिली जाणार असल्याची माहिती ‘न्यूज डंका’ च्या सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा:
ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक
महेश मांजरेकरांना न्यायालयाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
अखिलेश यादव की होगी हार, भाजपा करेगी ३०० पार
भाजपा नेते किरिट सोमैय्या यांनी डिसेंबर मध्येच यशवंत जाधव यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचे आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केले असून त्या संबंधित आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत असे सोमैय्या यांनी म्हटले होते. त्यावेळी यशवंत जाधव यांच्यावर टीका करताना त्यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे, असा टोला सोमैय्या यांनी लगावला होता.