काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आर्थिक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातील चार्जशीटमध्ये ईडीकडून प्रियांका गांधी यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.
रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्याबरोबरच प्रियंका गांधींनीही फरिदाबादमध्ये जमीन खरेदी केली होती. रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करत आहे. या तपासातूनच ही माहिती समोर आली आहे.
ईडीचं या प्रकरणात म्हणणं आहे की, ज्या इस्टेट एजंटकडून प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांनी जमिनीचा खरेदी व्यवहार केला. त्याच एजंटनं एनआरआय बिझनेसमन सीसी थम्पी या व्यक्तीलाही भूखंड विकले आहेत. त्यामुळं वड्रा आणि थम्पी यांचे अनेक काळापासून आर्थिक हितसंबंध आहेत.
हे ही वाचा:
इस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार
धुक्याच्या विळख्यामुळे उत्तर भारतात शाळांना सुट्टी
युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज
येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत
प्रकरण काय आहे?
फरिदाबाद येथील जमीन खरेदीबाबतचे हे प्रकरण असून फरिदाबाद येथील अमीपूर येथे २००५-०६ एचएल पाहवा या प्रॉपर्टी डिलरकडून रॉबर्ट वड्रा यांनी जमीन खरेदी केली होती. ही जमीन जवळपास ४० एकर इतकी आहे. ही जमीन २०१० साली पुन्हा पाहवा यांनाच विकण्यात आली होती. याशिवाय प्रियांका गांधी- वाड्रा यांच्या नावानेही जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन देखील अमीपूर गावातील होती. २००६ मध्ये या जमीनीचा व्यवहार झाला होता. यानंतर २०१० मध्ये ही जमीन देखील विकण्यात आली होती. पाहवा हे सीसी थंपी यांच्या निकटवर्तीय आहेत. अमीपूरमध्ये थंपी यांनीही जमीन खरेदी केली होती.