अनिल परब पुन्हा ईडी कार्यालयात

अनिल परब पुन्हा ईडी कार्यालयात

दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी आणि बांधकाम प्रकरणी ईडीने मंगळवार, २१ जून रोजी चौकशी झाली होती. त्यांनतर बुधवार,२२ जून रोजी म्हणजेच आज पुन्हा अनिल परब यांची ईडी चौकशी झाली आहे.

मंगळवारी अनिल परब यांची तब्बल ११ तास चौकशी झाली आहे. मंगळवारी अनिल परब सकाळी ११.२० वाजता दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि रात्री १०.४५ वाजता त्यांची चौकशी झाली. त्यांनतर आज पुन्हा अनिल परब यांना चौकशीसाठी बोलवले आहे. त्यांना याआधी १५ जून रोजी बोलावण्यात आले होते, परंतु अधिकृत कामाचे कारण सांगून त्यांनी हजर राहणे टाळले होते.

अधिकार्‍यांनी यापूर्वी सांगितले होते की फेडरल एजन्सी परब यांची चौकशी करू इच्छित आहे.परब आणि इतरांविरुद्ध पीएमएलए अंतर्गत नवीन गुन्हा नोंदवून ईडीने मे महिन्यात मंत्र्यांच्या आवारात आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. परब यांच्या चौकशीचे हे प्रकरण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींच्या कथित उल्लंघनाशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला

सायंकाळी ५ पर्यंत बैठकीला उपस्थित राहा! शिवसेनेचा आमदारांना इशारा

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केले होते. परबांच्या विरोधात काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या.

Exit mobile version