23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामासंजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?

संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?

ईडी करणार श्रद्धा बिल्डरची चौकशी

Google News Follow

Related

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान, पत्राचाळ प्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने मुंबईत छापेमारी केली आहे. मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप या ठिकाणी ईडीने छापेमारी केली. संजय राऊत यांच्या ताब्यातील अलीकडेच केलेल्या झडतीत सापडलेल्या आणि श्रद्धा बांधकाम कंपनीने खरेदी केलेल्या दोन महागड्या वाहनांचा आर्थिक व्यवहाराची ईडीने चौकशी करत आहे.

मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवार, १७ ऑगस्ट रोजी ईडीने छापेमारी केली आहे. कंपनीची कागदपत्रे तसंच संगणकाची देखील तपासणी करण्यात आली. श्रद्धा बिल्डर यांचे बरेचसे बांधकाम हे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात असल्याने ईडीने त्या ठिकाणीही छापेमारी केली आहे. या बिल्डरचे बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातले आहे. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात ईडीच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे. सांयकाळी उशिरापर्यंत ईडीची छापेमारी सुरु होती.

या बिल्डरने पूर्व उपनगरात म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह अनेक प्रकल्प राबवले आहेत. त्यामुळे ईडी त्यांच्या निधीचा स्रोत तपासत आहेत. पत्राचाळ फसवणुकीतून निर्माण झालेल्या गुन्ह्यातून बिल्डरला पैसे मिळाल्याचा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडी बिल्डरचे प्रवीण राऊत आणि संजय राऊत तसेच त्याच्या नातेवाईकांशी असलेले आर्थिक संबंध तपासत आहे. याप्रकरणी प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या संयुक्त मालकीच्या अवनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाचीही ईडीने झडती घेतली आहे.

दरम्यान, २००८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ने पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (जीएसीपीएल) ला दिला होता. जीएसीपीएल पत्राचाळमधील ६७२ भाडेकरूंना फ्लॅट आणि ३ हजार फ्लॅट म्हाडाला देणार होते. तर बाकीचे खासगी विकासकांना विकणार होते. मात्र प्रवीण राऊत आणि जीएसीपीएलच्या इतर संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केली आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स विकून ९०१.७९ कोटी रुपये कमावल्याचा आणि ६७२ भाडेकरूंना व म्हाडाला फ्लॅट न दिल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे.

हे ही वाचा:

‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’

रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ही भीती

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

जीएसीपीएल मधून बाहेर पडण्यापूर्वी प्रवीण राऊत यांना २०१० मध्ये एचडीआयएलकडून ११२ कोटी रुपये मिळाले. प्रवीण राऊत यांनी कथितरित्या काही रक्कम संजय राऊत यांना हस्तांतरित केल्याचा दावा ईडीने केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा