नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने सोमवार, १३ जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी चौकशी केली. राहुल गांधी हे सकाळी ११.३० वाजता एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.
एएनआयने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५० अंतर्गत राहुल गांधी यांचे वक्तव्य नोंदवण्यात आले आहे. पहिल्या फेरीत राहुलची तीन तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना जेवणासाठी बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. यादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसोबत सोनिया गांधींना भेटण्यासाठी सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले.
राहुल गांधी यांना ईडीच्या उपसंचालक, सहायक संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. तसेच ईडीने प्रथम राहुल गांधी यांना वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. राहुल गांधी यांच्या पुढील चौकशीमध्ये यंग इंडिया आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईडीने राहुल गांधींना काय विचारले किंवा काय विचारू शकते?
- तुमच्या भारतात किती मालमत्ता आहेत आणि कुठे कुठे आहेत?
- तुमची किती बँक खाती आहेत? कोणकोणत्या बँकेत खाते आहे? त्यांच्यात किती रक्कम जमा आहे?
- परदेशात बँक खाते आहे का? त्यांच्यात किती रक्कम आहे?
- परदेशात काही मालमत्ता आहे का? आणि असल्यास त्या कुठे आहेत?
- यंग इंडियनशी कसा संबंध आला?
हे ही वाचा:
‘काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी ईडीच्या कारवाईला समोर जावं’
सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार
… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात
ईडीला राहुल गांधी यांच्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून भागीदारी पद्धती, आर्थिक व्यवहार आणि ‘यंग इंडियन’ आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (AJL) ची भूमिका समजून घ्यायची आहे. ‘यंग इंडियन’ची स्थापना, ‘नॅशनल हेराल्ड’चे ऑपरेशन आणि कथित निधी हस्तांतरणाबाबत राहुल गांधी यांची चौकशी होऊ शकते.