शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे. हा तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे वृत्त आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे नातेवाईक आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर होते. मंगळवारी प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने चाकाशीसाठी त्यांना ताब्यात घेत दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेले होते. ईडीच्या कार्यालयात प्रवीण राऊत यांची चौकशी करण्यात आली. मात्र, प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.
HDIL या रिअल इस्टेट कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यामध्ये तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. पण ईडीच्या चौकशीत वर्षा राऊत यांनी आपण हे पैसै कर्ज म्हणून घेतले होते, असा दावा केला होता. या वादानंतर त्यांनी पैसे परत केली होती. पण आता इतकी मोठी रक्कम का दिली गेली याची चौकशी ईडी करत आहे.
हे ही वाचा:
मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा
क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?
‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला
प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर HDIL आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे ९० कोटी रुपये हडपले, असा आरोप ईडीने केला आहे.