शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेत अनिल परब यांची चौकशी ईडी करत आहे. आता अर्जुन खोतकर यांच्यावर देखील ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. खोतकरांची जालन्यातील कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

ईडीने अर्जुन खोतकर यांच्या घर, कार्यलय आणि कारखान्यावर छापा टाकला होता. या कारवाईत कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत, कारखान्याची यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

एकीकडे रिसॉर्टच्या बेकायदेशीर कामामुळे अनिल परब यांची ईडी चौकशी करत आहे. त्यामध्ये आता शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावर अर्जुन खोतकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या कारवाईबद्दल मला काहीही माहिती नाही. मी सध्या प्रवासात आहे. ईडी कार्यालयाला कारवाईचा अधिकार आहे. या कारवाईबद्दल न्यायालयात लढू, असे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी

४८ तासांत राज्य सरकारचे १६० शासनआदेश; दरेकरांनी राज्यपालांना लिहिले पत्र

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर शंभर कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनतर काही महिन्यांपूर्वी देखील ईडीने या कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती.

Exit mobile version