मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना एकत्र येऊन तृणमूल काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मुस्लिमांनी मतदान करताना मत वाया घालवू नये,  असं आवाहन त्यांनी केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करताना ममता बॅनर्जींनी हे विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून त्यांना निवडणूक आयोगाने आता नोटीस बजावली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला होता. “ममता बॅनर्जी मुस्लिम व्होटबँकेच्या नावावर मते मागत असल्याचं आरोप करतानाच आम्ही हिंदूनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला नोटीस पाठवली असती”, अशी टीका मोदींनी केली होती.

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींची आणि त्यांच्या पक्षाची म्हणजेच तृणमूल काँग्रेस पक्षाची मदार ही मुस्लिम मतांवर आहे. म्हणूनच मुस्लिम मतदारांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

लसींचं राजकारण बंद करा

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

जेव्हा अजित दादाच मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत

पश्चिम बंगालमध्ये याच निवडणुकीत एका नव्या पक्षाचा उदय झाला आहे. फुरफुरा शरीफचे मौलवी, अब्बास सिद्दीकी यांनी आयएसएफ म्हणजेच इंडियन सेक्युलर फ्रंट या नावाने एक राजकीय पक्ष काढला आहे. हा पक्ष मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांना आकर्षित करेल अशी भीती ममता बॅनर्जींना आहे. या नव्या आयएसएफ पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी युती देखील केली आहे.

Exit mobile version