केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि भारत आघाडीवर निशाणा साधला.अमित शहा म्हणाले की, काँग्रेसच्या राजकुमाराने ‘भारत जोडो यात्रे’ने निवडणुकीची सुरुवात केली, मात्र, त्याचा शेवट येत्या ४ जून नंतर कांग्रेस ढूंढो यात्रे’ने होईल. बरेलीमधून भाजपचे उमेदवार छत्रपाल गंगवार यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा बोलत होते.
अमित शहा म्हणाले की, आमच्यासमोर अहंकारी असलेली ‘इंडी’ आघाडी निडवणूक लढवत आहे.त्यांचे राजकुमार राहुलबाबा यांनी ‘भारत जोडो’ यात्रेने निवडणुकीची सुरुवात केली होती.मी आज बरेली मधून तुम्हाला एक सांगतो, यांनी निवडणुकीची सुरुवात ‘भारत जोडो यात्रे’ने केली मात्र याचा शेवट ४ जून नंतर कांग्रेस ढूंढो यात्रे’ने होईल.
हे ही वाचा:
दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!
भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना
ते पुढे म्हणाले की, दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दुर्बीण घेऊनही दिसत नाही, तर मोदीजी शतक ठोकून ४०० च्या पुढे निघून गेले आहेत.बरेलीमध्ये २०१० आणि २०१२ मध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या, परंतु काँग्रेस आणि सपा बरेलीच्या लोकांसोबत नव्हती. २०१७ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आणि पक्षाने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केले. इतक्या कमी कालावधीत योगी आदित्यनाथ यांनी यूपीला दंगलमुक्त केले. बरेलीतील तरुणांचे भले फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, केंद्रात १० वर्षे सोनिया-मनमोहन सरकार होते, ज्यांनी १० वर्षांत यूपीला केवळ ४ लाख कोटी रुपये दिले होते, परंतु मोदी सरकारने १० वर्षांत यूपीला १८ लाख कोटी रुपये दिले आहेत.ही निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे.आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याची ही निवडणूक आहे.