उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या अलिबाग येथील कथित १९ बंगल्यांच्या घोटाळाप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. यापूर्वी हे १९ बंगले गायब करण्यात आल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता त्या बंगल्यांची कागदपत्रे गायब झाल्याचा धक्कादायक खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
उध्दव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांशी संबंधित १९ बंगल्यांचा घोटाळा प्रकरणातील कोर्लई ग्रामपंचायत अलिबाग येथून १ फेब्रुवारी २०११ पासूनचे २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंतचे कागदपत्र, दस्तऐवज गायब असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ग्रामसेवक चेतन मगर यांनी रेवदंडा पोलिस स्टेशन येथे १२ जून रोजी तक्रार दाखल केल्याचेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. आधी १९ बंगले गायब आता कागदपत्र गायब, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उध्दव ठाकरे आणि रवींद्र वायकर परिवार
"19 बंगलो घोटाळा"कोर्लई ग्रामपंचायत अलिबाग 01/02/2011 ते 25/11/2017 दरम्यानचे कागदपत्र, दस्तऐवज "गायब"
रेवदंडा पोलिस स्टेशन येथे ग्रामसेवक चेतन मगर यांनी 122/2023 दिनांक 12/6/2023 तक्रार दाखल केली
"आधी 19 बंगलो गायब आत्ता कागदपत्र गायब" pic.twitter.com/zwqQGQUgcl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 13, 2023
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर १९ बंगल्यांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच याप्रकरणी अनेक वेळा किरीट सोमय्या यांनी अलिबागजवळच्या कोर्लई गावाला भेट देखील दिली होती.
हे ही वाचा:
ओदिशा अपघातामागील सत्य पाच कर्मचारी सांगणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!
‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!
आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
अलिबाग येथील अन्वय नाईक यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी साडेनऊ एकर जमीन आणि त्यावरील १९ बंगले २०१३ साली विकत घेतले होते. २०१४ मध्ये रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे पार्टनरशिपमध्ये जमीन आणि बंगले घेण्यात आले आणि ही प्रॉपर्टी नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रे देखील देण्यात आली. तसेच एप्रिल २०१३ ते मार्च २०२१ पर्यंत बंगल्यांची घरपट्टी ठाकरे यांनी स्वतःच्या खात्यामधून भरली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यात सदर जमीन दाखवण्यात आली. मात्र, बंगले दाखवण्यात आले नाहीत यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला.