मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन केरळच्या भाजपा राज्यप्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या राज्यव्यापी विजय यात्रेत भाजपात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या आणि संघाच्या पूर्वीच्या संबंधांना उजाळा दिला.
हे ही वाचा:
मेट्रो मॅनचा भाजपा प्रवेश, ‘या’ माजी काँग्रेस मंत्र्याने ट्वीटरवरून केले स्वागत
त्यांनी असे सांगितले की ते शाळेत असल्यापासून संघाचे स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्या जीवनातील मूल्ये संघाच्या पायावर आधारित आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की, त्यांचा इतर सर्व राजकिय पक्षांवरील विश्वास उडाला असून, ते भाजपाच्या विकासाच्या दृष्टीकोनामुळे पक्षप्रवेश करणार आहेत.
येत्या निवडणूकांमधील त्यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, श्रीधरन यांनी सांगितले की याबाबत योग्य वेळ आली की पक्ष योग्य तो निर्णय घेईलच. ते म्हणाले, की भाजपामध्ये सामिल होण्याचा निर्णय त्यांनी अचानक घेतलेला नसून अतिशय विचारपूर्वकपणे घेतलेला आहे. ई श्रीधरन यांना विश्वास आहे की, भाजपाच्या अंमलातच केरळचा विकास होऊ शकतो.
ई श्रीधरन हे त्यांच्या दिल्ली मेट्रोच्या अभूतपूर्व कामामुळे मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. आता जनतेच्या विकासासाठी ई श्रीधरन राजकारणात प्रवेश करणार आहेत असं चित्र आहे. पश्चिम बंगाल नंतर दक्षिणेतील इतर राज्यांच्या निवडणूका देखील लवकरच पार पडणार आहेत.