केरळमध्ये ६ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाचे केरळ प्रदेश प्रमुखांनी इ. श्रीधरन् यांना भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
हे ही वाचा:
“इ श्रीधरन हे भाजपाचे केरळच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.” असे सुरेंद्रन् यांनी घोषित केले आहे.
इ. श्रीधरन् यांनी सांगितले की मला पूर्ण विश्वास आहे या वेेळेस केरळमध्ये भाजपाच मोठ्या दणक्यात निवडून येईल. ते असेही म्हणाले की लोकांना त्यांच्यासाठी काय चांगले आहे याची पूर्ण जाणिव आहे आणि त्यामुळेच मला पूर्णपणे विश्वास वाटतो की यावेळी भाजपाच बहुमताने सत्तेत येईल. मी भाजपाकडे फक्त एकच विनंती केली आहे, की मी सध्या राहत असलेल्या पोन्नानीपासून लांब नसलेल्या मतदारसंघातून मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
भाजपाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्याच्या शारिरीक ताकदीपेक्षा मानसिक ताकदीनुसार त्याच्यावर कोणती जबाबदारी देण्यात यावी हे ठरते.
सध्याच्या काळात मानसिक आरोग्य हे शारिरीक आरोग्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. मानसिकदृष्ट्या मी अजून तरूण आहे. अजूनपर्यंत मला कोणतीही शारिरीक व्याधी नाही, त्यामुळे मला नाही वाटत की आरोग्य माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. मी राजकारणी होणार नसून मी नेहमीच्या तज्ञांसारखं काम करत राहिन.
आजच केरळचे भाजपा प्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन् यांनी १६ सदस्यीय निवडणूक समिती घोषित केली आहे. त्यातही इ श्रीधरन् यांचा समावेश आहे.