द्वारका द्रुतगती मार्ग ज्याला नॉर्दर्न पेरिफेरल रोड म्हणूनही ओळखले जाते तो २०२३ मध्ये कार्यान्वित होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली. हा द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतर दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
भारतातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती मार्ग म्हणून विकसित होत असलेल्या द्वारका एक्सप्रेसवेमुळे दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवे आणि पश्चिम दिल्लीतील इतर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल असे गडकरींनी ट्विटरवर लिहिले आहे.
दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्ग हा सुवर्ण चतुष्को णाच्या ‘दिल्ली-जयपूर-अहमदाबाद-मुंबई’ शाखेचा एक भाग आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग- ८वरील ५०-६० टक्के वाहतूक नवीन द्रुतगती मार्गावर वळविली जाईल, ज्यामुळे सोहना रोड आणि गोल्फ कोर्स रोडच्या दिशेने वाहतूक सुधारेल.
हे ही वाचा:
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं
१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई
२०२३ मध्ये तो कार्यान्वित झाल्यानंतर, दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी देखील ते खूप पुढे जाईल. हा द्रुतगती मार्ग १६ मार्गिकांचा असून, दोन्ही बाजूंना किमान तीन लेन सर्व्हिस रोडची तरतूद आहे असेही गडकरींनी सांगितले.