मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए यांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत पोस्टरबाजी केली आहे. त्यामुळे यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगणार का यावर चर्चा सुरू होत्या. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई करायची नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर मेट्रो मार्ग सुरू होत आहेत याचा आनंद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मेट्रोचे काम करण्यास आम्ही सुरू केलं होत. मुंबईकरांना माहित आहे कोणत्या सरकारच्या काळात किती काम झालं होत. आता सरकारने मेट्रो ३ चं बघावे. नाहीतर श्रेय वादाच्या नादात अपयशाचे खापरं फुटेल तुमच्यावर,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
वकील सतीश उके यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. उके यांच्यावर सुरू असलेली कारवाई ही नागपूर पोलिसांची म्हणजेच महाराष्ट्र पोलिसांची आहे. पोलिसांनी ईडीकडे तक्रार केली होती. २००५ पासून त्यांच्यावर अनेक एफआयआर दाखल होते. न्यायाधीशांशी खोटी तक्रार केल्याची शिक्षा झाली होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.