23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअमित शहा म्हणाले, मोदींना गोवण्यासाठी सीबीआय तेव्हा माझ्यावर दबाव आणत होती!

अमित शहा म्हणाले, मोदींना गोवण्यासाठी सीबीआय तेव्हा माझ्यावर दबाव आणत होती!

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुलाखतीदरम्यान केला गौप्यस्फोट

Google News Follow

Related

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेसने आपला कांगावा सुरु केला आहे. केंद्रातील सरकार विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आले की, मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे का ?  या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला.

यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच गुजरातमधील एका कथित बनावट चकमक प्रकरणात गोवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. राहुल गांधी यांचे सदस्यत्व गेल्यानंतर नऊ विरोधी पक्षांनी एकवटत तपास यंत्रणांच्या गैरवापरावर पंतप्रधानांना पत्र लिहून दखल घेण्यास सांगितले होते. तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवण्यासाठी १४ विरोधी पक्षांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा या प्रमुख पक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी विरोधी पक्षांच्या नौटंकीवर जोरदार हल्ला चढवला आहे. गृहमंत्री म्हणाले, या कथित बनावट चकमक प्रकरणात मोदींच्या चौकशीदरम्यान सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुम्ही टेन्शन घेऊन नका तुम्ही नरेंद्र मोदींचं नाव सांगून टाका यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता असं अमित शाह यावेळी म्हणाले. पण तरीही भाजपने कधीही गदारोळ केला नाही. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सभागृहाचे सदस्यत्व गमावलेले काँग्रेस नेते राहुल गांधी हे एकमेव नेते नाहीत. त्यामुळे इतका गदारोळ करण्याची गरज नाही राडा करण्याची गरज नाही, अशा शब्दात गृहमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

राहुल यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयात जावे. मात्र तसे करण्याऐवजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षेला स्थगिती देता येणार नाही, न्यायालयाची इच्छा असल्यास स्थगिती देऊ शकते,असा विनाकारण भ्रम पसरवण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असल्याचेही शहा म्हणाले.

हे ही वाचा:

एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी

हा कसला अहंकार ?

राहुल गांधींनी अद्याप शिक्षेला स्थगिती देण्यासाठी अपील केलेले नाही. हा कसला अहंकार? तुम्हाला दया दाखवायला हवी आहे. खासदार म्हणूनही राहायचे आहे. पण कोर्टात का जायचे नाही?. मोठमोठी पदे भूषविणाऱ्या आणि त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या राजकारण्यांनाही या तरतुदीमुळे सदस्यत्व गमवावे लागले असल्याकडे गृहमंत्री शहा यांनी लक्ष वेधले. लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह १७ जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का? असा सवाल शाह यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा