आपचे माजी नेते आणि मंत्री कैलाश गहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी सांगितले की पक्षातील मूल्ये आणि तत्त्वे कमी झाल्याचे पाहून त्यांनी राजीनामा देण्याचे धैर्य दाखवले. एएनआयशी बोलताना गहलोत म्हणाले की, “हे एका रात्रीत घडत नाही, यासाठी प्रदीर्घ कालावधीत घडते. काही गोष्टी समजण्यास वेळ लागतो. मी हे पुन्हा पुन्हा सांगत आहे की आम्ही काही मूल्ये आणि तत्त्वांशी जोडलेले आहोत. जर त्यात काही कमीपणा दिसला तर, मी पक्ष सोडण्याचे धैर्य एकवटले. माझ्यासारखे बरेच लोक आहेत जे मला वाटते की पुढे काम चालूच ठेवतील.”
खाते वाटपावरून ते मुख्यमंत्री आतिशी यांच्याशी नाराज आहेत का? असे विचारले असता, भाजपा नेते कैलाश गहलोत म्हणाले की, मला कोणाच्याही विरोधात काहीही मनात नाही. माझी ओळख अजूनही परिवहन मंत्री म्हणून आहे. परिवहन हाताळताना मला आनंद आणि समाधान मिळाले. मी माझा सगळा वेळ वाहतूक हाताळण्यात घालवला. माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाही. कोणता पोर्टफोलिओ कोणाला असावा हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. यावर माझ्याकडे काही बोलण्यासारखे नाही,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र
आचारसंहितेच्या काळात कारवाई दरम्यान ६६० कोटींची मालमत्ता जप्त
व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे
मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात
कैलाश गहलोत यांनी एकूणच आपच्या पुढील वाटचालीसाठी चिंता व्यक्त केली आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात कैलाश गेहलोत यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने राजीनामा देत असल्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केजरीवाल सरकारमधील प्रमुख मंत्री गेहलोत यांचा राजीनामा आम आदमी पक्षासाठी एक धक्का मानला जात आहे. विशेषतः पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत, त्यापूर्वी हा पक्षाला मोठा धक्का बसला आहे.