ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, अनेक वैद्यकिय सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. वसई- विरार येथील काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याची अतिशय निंदनीय घटना घडली आहे.

वसई- विरार महानगरपालिकेच्या नलासोपारा येथील विनायका रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर सिद्धीविनायक रुग्णालयात २ रुग्णांचा बळी गेला आहे. त्याशिवाय वसईमध्ये दोन रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

ममतांना निवडणूक आयोगाचा दणका

नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर

या घटनेवर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टिका केली आहे. ‘वसई-विरारसह संपूर्ण राज्यात भयाण परिस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभाराचे परिणाम जनता भोगते आहे’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना या घटनेसाठी अत्यंत अकार्यक्षम आणि बेजबाबदार मुख्यमंत्री जबाबदार असल्याचे देखील म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडायच्या बेताला आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नसणे, ऑक्सिजन उपलब्ध नसणे अशा सारखे संतापजनक प्रकार समोर येत आहेत.

रेमडेसिविर औषधाचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, परंतु भाजपाने दमणच्या रेमडेसिवीर उत्पादकांकडून राज्याला ५० हजार इंजेक्शनचा पुरवठा होईल याची सोय केली आहे. त्याबरोबरच सातत्याने मोठ्या प्रमाणात हे औषध उपलब्ध होऊ शकेल याची देखील सोय केली आहे.

Exit mobile version