चक्रीवादळासाठी केंद्रावर भार नाही; ओडिशा स्वतः करणार तयारी

चक्रीवादळासाठी केंद्रावर भार नाही; ओडिशा स्वतः करणार तयारी

महाराष्ट्रामध्ये पदोपदी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवणारे सरकार अस्तित्वात असताना, दुसरीकडे ओडिशाने मात्र यास चक्रीवादळामुळे झालेले नुकसान स्वतःच स्वतःच्या पैशातून भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यास चक्रीवादळानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बोलताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा निश्चय व्यक्त केला होता.

‘यास’ वादळामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीचे नुकसान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाच्या लँडफॉलनंतर या भागाचा हवाई पहाणी दौरा केला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशा राज्याला दरवर्षी चक्रीवादळाचा फटका बसत असल्याने राज्याने चक्रीवादळांचा सामना करण्याची दूरगामी तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच या संकटाचा सामना करू, असा विश्वास व्यक्त केला.

हे ही वाचा:

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

शिवसेनेच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय उद्रेक

याबद्दल ट्वीटमध्ये नवीन पटनायक यांनी सांगितले, की कोविड-१९ च्या परिस्थितीत आम्ही तात्काळ कोणत्याही स्वरूपाची मदत केंद्राकडून न घेता, आम्ही आमच्याच उपलब्ध साधनसामुग्रीतून स्वतःची गरज भागवू.

यावेळी ट्वीट करताना, नवीन पटनायक यांनी सांगितले की मोदींसोबतच्या चर्चेमध्ये ओडिशाला हवामानाशी निगडीत संकटांसाठी अधिक कणखर बनवण्याबाबत चर्चा झाली. त्यासोबतच वादळांविरूद्ध सक्षम करण्यासाठी वेगळ्या तऱ्हेच्या उपाययोजना करण्याबाबतही त्यांच्याशी चर्चा झाली. त्याबरोबरच केंद्राने दर्शवलेल्या संपूर्ण पाठिंब्यासाठी नवीन पटनायक यांनी केंद्राचे आभार मानले आहेत. त्यासोबतच मोदींनी वादळाने झालेल्या नुकसानाची हवाई पहाणी केली त्याचेही आभार मानले आहेत.

Exit mobile version