थंडीमुळे मतदानाला थंड सुरुवात!

थंडीमुळे मतदानाला थंड सुरुवात!

लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरु झाले आहे. राजकीयदृष्ट्याही उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात महत्त्वाचे राज्य मानले जात असल्यामुळे या निवडणुकीचे वेगळेच महत्त्व आहे. पण असे असतानाही मतदानाची सुरुवात मात्र या पद्धतीने होताना दिसत नाहीये.

मतदान केंद्रावर नागरिक आपला हक्क बजावण्यासाठी आले असले तरीही प्रतिसाद मात्र संथ दिसत आहे. काही मतदान केंद्रावर मतदारांची रांग लागलेली दिसत आहे, तर काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या थंड प्रतिसादामागचे मुख्य कारण थंडी आणि धुके असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर

‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

आज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा! ५८ जागांवर ६२३ उमेदवार रिंगणात

सध्या देशभर निवडणुकीमुळे वातावरण तापलेले असले तरीही थंडीची चांगलीच लाट पसरली आहे. त्यातच उत्तरेकडील राज्य ही कायमच थंडीसाठी चर्चेत असतात. उत्तर प्रदेशमध्ये मतदान होत असलेल्या पश्चिमी क्षेत्रात सुद्धा अशाच प्रकारे थंड सकाळ पाहायला मिळत आहे. बऱ्याच भागांमध्ये तापमान चार ते पाच अंशांपर्यंत खाली गेले आहे. तर अनेक ठिकाणी धुक्याची सादरही पाहायला मिळत आहे.

या वातावरणामुळे सकाळी सकाळी नागरिकही मतदानासाठी तेवढ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे चित्र दिसत नाहीये. पण राजकीय तज्ञांच्या मते ही अतिशय सामान्य बाब असून १०-१०.३० नंतर जेव्हा थंडीचे प्रमाण कमी होईल तेव्हा मतदानाचा प्रतिसाद आणि टक्केवारी वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आज एकूण ५८ जागांसाठी मतदान पार पडत असून या ५८ जागांपैकी ९ जागा या एससी, एसटी उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत. तरी या ५८ जागांवर एकूण ६२३ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यापैकी ७४ महिला उमेदवार आहेत. तर या सर्व उमेदवारांचे भवितव्य हे २ कोटी २७ लाख मतदारांच्या हातात असणार आहे. त्यामुळे आजचा हा निवडणुकीचा टप्पा हा फारच महत्वाचा आहे. तर यानंतर आणखीन ६ टप्पे पार पडणार आहेत.

Exit mobile version