26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणभाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या हाताळणीसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्यावर भाजपाने टीकेची झोड उठवली होती. अनेक माध्यमांतून लसीकरणाला प्राधान्य देण्याऐवजी फक्त प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची खैरात केल्याची जळजळीत टीका करण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा हा आदेश मागे घेतला आहे.

उपमुख्यमंत्र्यांवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. त्यांनी ही टीका करताना सरकारला लोकांचे जीवन महत्त्वाचे नसल्याचे म्हटले होते. त्याबरोबरच त्यांनी टीका करताना शरद पवारांना देखील लक्ष्य केले होते. त्यावेळी अतुल भातखळकरांनी त्यांना शेतकरी आणि मराठा आंदोलनाची काळजी नसून, त्यांना काळजी बार मालकांची असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

आता दुसरे ट्वीट करत त्यांनी करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचल्याची भावना व्यक्त केली आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,

BJP impact उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही. बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. चला, करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले…

महाराष्ट्रात लसीकरण वेगाने करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तेवढा एकच मार्ग शिल्लक राहिलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सरकारने त्यावर खर्च करण्याचे सोडून प्रसिद्धीसाठी पैसा खर्च केल्याचे समोर आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांवार टीकेची झोड उठली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा