30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणसोशल मीडिया हँडलवरून 'मोदी का परिवार' हटवा!

सोशल मीडिया हँडलवरून ‘मोदी का परिवार’ हटवा!

पंतप्रधान मोदींचे समर्थकांना आवाहन

Google News Follow

Related

लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आता एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आहे.दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे.सोशल मीडियावर आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिणाऱ्या समर्थकांचे आभार मानत पंतप्रधान मोदींनी ते आता काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर तोफ डागली.त्यावेळी विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या कुटुंबावर हल्ला चढवला.यावरून पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ सर्वजण एकवटत आमदार, खासदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ ही टॅग लाईन दिली.दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ही आता टॅग लाईन हटविण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!

“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”

निवडणुकीत ठाकरेंनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला!

लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!

पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतातील लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ‘मोदी का परिवार’ जोडल्यामुळे मला खूप बळ मिळाले.भारतीय जनतेने एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे, हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश दिला आहे.

“आपण सर्व एक कुटुंब आहोत हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यानंतर, मी पुन्हा एकदा भारतातील लोकांचे आभार मानतो आणि विनंती करतो की, तुम्ही आता तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ‘मोदी का परिवार’ हटवू शकता आणि आपले नाव बदलू शकता, पण भारताच्या प्रगतीसाठी झटणारे एक कुटुंब म्हणून आमचे नाते मजबूत आणि अतूट आहे., असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा