पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून देशातील ८५० जिल्ह्यांमध्ये ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे सचिव डॉक्टर सी सतीश रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
कोविडच्या महामारीच्या या बिकट परिस्थितीत डीआरडीओच्या माध्यमातून देशभरात अनेक महत्वाचाही कार्ये पार पडली गेली आहेत. यात प्रामुख्याने देशातील विविध भागात आवश्यकतेनुसार कोविड उपचारांना समर्पित अशी रुग्णालये उभारणे या गोष्टीचा समावेश आहे. तर त्या बरोबरीनेच आता डीआरडीओच्या माध्यमातून देशभर ८५० जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे प्लॅन्ट उभारले जात आहेत. कोविडच्या या महामारीत देशभर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कामरतरता भासली असून ती गरज भागवण्यासाठी औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. तर एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सुलभ आणि जलद ऑक्सिजन वाहतूक होण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसची सुविधा सुरु करण्यात आली.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन
शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं पाप करू नका
जमीन खरेदी विषयावरून राम मंदिर विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार
जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…
पण भविष्यात ही त्रेधा संपवून ऑक्सिजनचा पुरवठा सुलभ व्हावा या दृष्टीने मोदी सरकारने ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. त्यासाठी देशभर ८५० जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे प्लॅन्ट डीआरडीओच्या माध्यमातून उभारले जात असून त्यासाठीचा निधी हा पीएम केअर्स फंडातून देण्यात आला आहे. डीआरडीओचे सचिव डॉ. रेड्डी यांनीच ही माहिती जाहीर केली आहे. या माहितीमुळे पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडावर सवाल उपस्थित करणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.