ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’ 

चर्चेत ट्रम्प राहिले आघाडीवर

ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’ 

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वादाची पहिली फेरी पार पडली. दोघांनी सुमारे ७५ मिनिटे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून वैयक्तिक वाभाडे काढले.

ट्रम्प यांनी बायडेन यांना मंच्युरिन संबोधून त्यांना चीनकडून पैसे मिळत असल्याचा आरोप केला. तर, बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत आणि मूर्ख संबोधले. जेव्हा ट्रम्प यांची पत्नी गर्भवती होती, तेव्हा त्यांनी पॉर्न स्टारशी संबंध ठेवले होते, असे ते म्हणाले.

जॉर्जियाची राजधानी अटलांटामध्ये सीएनएनच्या स्टुडिओत झालेली ही चर्चा सुमारे आठ कोटी लोकांनी पाहिली. ट्रम्प यांनी बायडेन यांना म्हातारे आणि बेकार असे संबोधले तर, बायडेन यांनी त्यांच्या वयावरून केली जाणारी चर्चा निरर्थक आहे कारण स्वतः ट्रम्प हे त्यांच्यापेक्षा अवघ्या तीन वर्षांनी लहान आहेत, असे म्हटले. त्यावर ट्रम्प यांनी आपण पूर्णपणे फिट आहोत, असा दावा केला. त्यांनी नुकतीच गोल्फ चॅम्पियनशिपही जिंकली आहे. जर बायडेन यांच्या हातात गोल्फ स्टिक दिली तर चेंडू १५० फूट अंतरही जाणार नाही, असे त्यांनी चिडवले.

यावेळी ट्रम्प यांनी पॅरिस कराराविषयीही म्हणणे मांडले. ‘मी अमेरिकेला या करारातून बाहेर काढले कारण भारत व चीन पैसे देत नव्हते. खरे तर, अमेरिकेच्या लोकांना करारांतर्गत एक लाख कोटी डॉलर मिळणे अपेक्षित होते,’ असे ट्रम्प म्हणाले. तर, बायडन यांनी जर ट्रम्प अध्यक्ष झाले तर, हवामान बदलाबाबत झालेले काम ते नष्ट करून टाकतील, असा दावा केला.

हे आहेत वादाचे नियम आणि विजय-पराजयाचा फॉर्म्युला
या वादाचे सूत्रसंचालन सीएनएनच्या दोन अँकर जेक टॅपर आणि डाना बॅश यांनी केले. त्यांना मध्यस्थ किंवा मॉडरेटरही बोलले जाते. याला प्रेसिडेन्शिअल डिबेट असे संबोधले जाते.

कारण हा वाद रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारादरम्यान होतो. वादविवादादरम्यान दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप करतात आणि ते आरोपांना प्रत्युत्तर देतात. आरोप-प्रत्यारोप आणि उत्तर देण्यासाठी प्रत्येकाला एकेक मिनिटाचा अवधी मिळतो. तर, सूत्रसंचालकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला जातो.

हे ही वाचा:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास काय होईल?

चर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ?

भाजपाचा ‘शक्तिमान’ |

मुंबईत सायलेन्सर, प्रेशर हॉर्न ‘रोडरोलर’ खाली चिरडले

वादविवादानंतर पराभव आणि विजय ठरतो. प्रसारमाध्यमे आणि तज्ज्ञांचे मत, ओपिनियन पोल्सचे निकाल, सोशल मीडियावरील मतप्रवाह आणि मतदानाचा हेतू या चार मुद्द्यांवर विजयी उमेदवार ठरतो.

बहुतेकांनी ट्रम्प यांना मानले विजेता

सध्या दोघांमध्ये वादविवादादरम्यान जोरदार चर्चा सुरू आहे. तर, अमेरिकेतील बहुतांश प्रसारमाध्यमांच्या संस्था व न्यूचवाहिन्यांनी ट्रम्प यांना विजेता घोषित केले आहे. सीएनएनच्या इन्स्टंट पोलमध्येही ६७ टक्क्यांहून अधिक जणांनी ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे.

Exit mobile version