उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी

विधानसभेत आज सरकारची माहिती.

उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी

मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या नालेसफाई कामांकरिताची निविदा प्रक्रिया हि शेवटच्या टप्प्यात आली असून ही सर्व कामे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करणार आहेत, पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे, असे महानगरपालिकेने कळवले असल्याचे, विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार, पराग अळवणी , तामिळ सेलवन ,यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या निविदांना विलंब झाल्याकडे लक्ष वेधले यावेळेस मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर देताना सांगतले की, मुंबईतील नालेसफाईची कामे नियमितपणे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात आणि नाल्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी असलेली सफाईची किरकोळ कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात.

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम विभागातल्या छोटे, मोठे नाले तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या तसेच मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामांकरिता महानगरपालिकेमार्फत एकूण ३१ निविदा मागवण्यात आलेल्या असून या सर्व निविदा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हि सर्व कामे मार्च २०२३च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणूनच पावसाळ्यापूर्वी करण्याची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,  असे मुंबई महापालिकेने कळविले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

अजित दादांना शाब्दिक चिमटा

‘हे सरकार दोन्ही हाताने देणारे सरकार आहे ,घेणारे नाही तसाच आम्ही फक्त बोलत नाही तर देतोही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना चिमटा काढला आहे.जेव्हा शेती ,उत्पादन आणि नुकसानभरपाईचा मुद्द्यांवरून विरोधकांनी आज सत्ताधाऱ्यांना घेरले होते.

दरम्यान अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान , नियमित कर्जफेड, करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ आणि इतर नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाली नाही. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली . हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार ती तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा ३१ मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस दिले आहे.

Exit mobile version