स्वपन दास गुप्ता पुन्हा राज्यसभेवर

स्वपन दास गुप्ता पुन्हा राज्यसभेवर

प्रसिद्ध पत्रकार, लेखक, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत डॉक्टर स्वपन दास गुप्ता यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे. २०१६ साली स्वपन दास गुप्ता यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. पण या वर्षी त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेली पश्चिम बंगालची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून फारच प्रतिष्ठेची बनवण्यात आली असून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून भाजपाने कंबर कसली होती. या निवडणुकीत भाजपातर्फे अनेक दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली. त्यातच स्वपन दास गुप्ता यांचा समावेश होता. पश्चिम बंगाल मधील तारकेश्वर या विधानसभा क्षेत्रातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्याआधी स्वपन दास गुप्ता हे २०१६ साली राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले होते. राष्ट्रपतींच्या कोट्यातून ज्या बारा आमदार खासदारांची नियुक्ती करण्यात येते त्यात गुप्ता यांचा समावेश होता. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी १६ मार्च २०१९ रोजी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हे ही वाचा:

अब की बार, फिर से ३०० पार

मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

स्वपन दास गुप्ता यांच्या राजीनाम्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. तर दुसर्‍या बाजूला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही गुप्ता यांचा पराभव झाला. त्यामुळे स्वपन दास गुप्ता यांची पुन्हा एकदा त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या उर्वरित काळासाठी म्हणजेच २४ एप्रिल २०२२ पर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version