निलंबनानंतर सत्यजीत तांबेंनी काँग्रेसला दाखवला आरसा

आमच्या परिवाराशी राजकारण झालं

निलंबनानंतर सत्यजीत तांबेंनी काँग्रेसला दाखवला आरसा

सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. सत्यजित तांबे यांची भूमिका आता काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या भूमिकेविरोधात सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्यावर ६ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या चार पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाची सेवा केल्यानंतर झालेल्या या निलंबनाच्या कारवाईनंतर तांबे यांनी  आपली भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु आमच्या परिवाराबद्दल खूप राजकारण झाले आहे योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल बोलू असे सूचक विधान तांबे यांनी केली केलं आहे. लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील माविआ यांच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा जाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी विचार करायला लावणारी प्रतिक्रिया दिली आहे. मागील पाच सहा दिवसात आमच्या कुटुंबाबत बरेच राजकारण झाले आहे त्यावर वेळ आल्यावर बोलूच. ही निवडणूक राजकारण म्हणून आमच्यासाठी महत्वाची नाही तर या मतदार संघाशी असलेला ऋणानुबंध पुढे घेऊन जायचा आहे.

तांबे म्हणाले की, थोरात साहेब १९८५ साली आमदार झाले. त्यापूर्वी माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हेही आमदार होते. त्यामुळे आमच्यासाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही. माझ्या आजोबांपासून आम्ही चार पिढ्यांपासून सातत्याने काँग्रेसमध्ये काम करत आहोत.  मी २२ वर्ष काँग्रेससाठी काम केले आहे. जन्मापासून काँग्रेस माहिती आहे . आमच्या रक्तात काँग्रेस, आमच्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून दुसरा कुठलाच विचार केला नाही. अनेक लोक पक्षात आले गेले मोठे झाले पण आम्ही तशी भावना कधी ठेवली नाही. एकनिष्ठेने पक्षबरोबर होतो.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

२०३० मध्ये माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. सत्ता हा मुद्दा आमच्यासाठी फारसा महत्वाचा नाही. राजकारणासाठी आपण काय करायला आलो आहोत ते माझ्यासाठी महत्वाचे आहे असे स्पष्ट मत तांबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे काँग्रेसने निलंबित करण्याचे प्रचंड दुःख आहे योग्य वेळ आल्यावर त्याला उत्तर देईन. लवकरच भूमिका जाहीर करेन असे तांबे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version