26 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार

राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार

Google News Follow

Related

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अनेकदा गरजूंना मदत करत माणुसकीचे दर्शन दिलेले आहे. अशाच एका घटनेची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काल (१५ ऑक्टोबर) डॉ. भागवत कराड हे विमानप्रवासात असताना अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली असताना तत्काळ कराड यांनी गरजूच्या मदतीसाठी धाव घेत त्यावर उपचार केले.

काल राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगो कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान विमानातील १२ A या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यामुळे तो प्रवासी विमानातच कोसळला. यामुळे सहप्रवाशांमध्ये घबराट निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या सर्व परिस्थितीत डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता एक कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून त्यांनी ताबडतोब संबंधित प्रवाशावर सुश्रुषा केली. त्यानंतर त्यांनी ‘आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. “एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ” संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या’ असे मत व्यक्त केले.

हे ही वाचा:

वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

यापूर्वीही औरंगाबादमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी माणुसकीचे दर्शन दिले होते. ऑक्टोबरमध्ये औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेला अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघात ग्रस्ताची मदत केली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा