… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांकडून मिळणारा अंगरक्षक नाकारला आहे. गोपीचंद पडळकर यांनी यासंबंधी ट्विट करत म्हटले आहे की, रक्षकच जर आर भक्षक बनणार असतील तर अंगरक्षक नको, असे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि पालकमंत्री जयंत पाटील हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सामील असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर ७ नोव्हेंबरचा त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला असून तेव्हा पोलिसांनी कशी बघ्याची भूमिका घेतली हे पडळकर यांनी सांगितले आहे. आटपाडी पोलीस स्थानकाच्या समोर हा हल्ला झाला आणि व्हिडीओमधून हे स्पष्ट होत आहे की, हा हल्ला सुनियोजित होता, असे पडळकर म्हणाले.

हे ही वाचा:

रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

राज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार

पंतप्रधान मोदींनी मुलांसाठी केली ही घोषणा

खरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल?

व्हिडीओमध्ये गोपीचंद पडळकर यांची गाडी ज्या दिशेने येत आहे त्याच्या विरुद्ध दिशेला २०० ते ३०० जणांचा जमाव लाठ्या, काठ्या हातात घेऊन उभा होता. पहिले गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर गाडीचा वेग कमी झाला की, डंपरने गाडीला ठोकायचे असा कट असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रीकरण पोलीस करत असल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. हा हल्ला रोखायचा सोडून पोलीस चित्रीकरणात मग्न आहेत, असे पडळकर म्हणाले. या पोलीस संरक्षित हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि पालकमंत्री जयंत पाटील सामील असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

कारवाईच्या नावाखाली अंगरक्षकाला निलंबित केले आणि ३०७ चा खोटा गुन्हा दाखल केल्याचे पडळकरांनी म्हटले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे आता अंगरक्षक नाकरण्याचा निर्णय घेतल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. रक्षकच भक्षक बनले असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version