लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती

लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकार कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. याला भाजपाच्या अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन लॉकडाऊनला विरोध केला आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लागू करु नये अशी मागणीही केली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांसमोर राज्यातील शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक, विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा केली.

गेले वर्षभरामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना अशा अनेक संकटाना सामोरे जाताना सरकारकडून कोणतीच उपाय योजना होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारला योग्य ते निर्देश व्हावेत, अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यात संघटनेच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिपक पगार, परभणी जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार, हातकणंगले तालुकाध्यक्ष गुंडुराव मोरे, कोकणातील मच्छीमार शिष्टमंडळातील नितिश गलांडे, कमलेश पटवा, सुमित गायकवाड, पांडुरंग रघुवीर हे उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नियम शिवसेनाच पाळत नाही?

लुटीचा मुद्देमाल जनतेला केला परत

…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर

आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा

शुक्रवारी रात्री ८:३० वाजता जनतेसमोर येऊन मुख्यमंत्र्यांनी १-२ दिवसांत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्री ४ किंवा ५ तारखेला लॉकडाऊनची घोषणा करणार का? लॉकडाऊन केल्यास त्याचे नियम काय असतील? कालावधी काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version